Monday, 24 June 2019

सुलतानाला झटका

खरतर इस्तंबूल शहराच्या महापौर निवडणुकीसाठी दुसर्‍यांदा झालेल्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला असून मुख्य विरोधी पक्षाचे उमेदवार अक्रम इमामोग्लू यांना 54% मतं मिळाली आहेत. इस्तंबूलच्या महापौरपदासाठी मार्च महिन्यात निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये आपल्या पक्षाचा पराभव झाल्याने, आपल्या ताब्यातील निवडणूक आयोगाला अर्दोगान यांनी पुन्हा निवडणुक घ्यायला लावली. अर्दोगान यांच्या पक्षाच्या विरोधात निकाल लागल्याने सत्ताधारी एके पक्षाने या निवडणुकांवर आक्षेप घेतला. त्यामुळे ही निवडणूक रद्द ठरवण्यात आली आणि पुन्हा निवडणुका झाल्या.
भारतात, नरेंद्र मोदी भविष्यात कसे वागु शकतात आणि ते जर असे वागले तर काय होऊ शकते हे पहायचे असेल तर तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसप तय्यब अर्दोगान ज्यांना जगात सुलतान म्हटले जाते, त्यांच्याकडे पहायला हवे. लोकशाही मार्गाने सत्तेवर येऊन हुकूमशहा कसे होता येते, हे हिटलर पासून ते आता अर्दोगान यांच्या पर्यंत एक उदाहरण म्हणून पाहता येते. हे उदाहरण भारतात घडू नये. धार्मिक आणि राष्ट्रवादी भावना भडकावून सत्तेत येता येते, झोलझाल करुन सत्तेत राहताही येते. पण काही काळच! लोकांना सत्य कळले की उशिरा का होईना पण सत्तेतून पायउतारही व्हावे लागते. हिटलरला अमरत्व मिळाले नाही तर हिटलरला मानणार्‍यां कुठून मिळणार? तुर्कस्तानच्या पार्श्वभूमीवर भारताची परिस्थिती ठेऊन पाहिली तर एक मोठा धडा शिकायला मिळू शकतो.
तर झाले असे,अर्दोगान यांच्या पक्षाला राजधानी इस्तंबूलच्या महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत पराभव पत्कराला लागला आहे. अर्दोगान यांच्यासाठी हा मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.
खरतर इस्तंबूल शहराच्या महापौर निवडणुकीसाठी दुसर्‍यांदा झालेल्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला असून मुख्य विरोधी पक्षाचे उमेदवार अक्रम इमामोग्लू यांना 54% मतं मिळाली आहे.इस्तंबूलच्या महापौरपदासाठी मार्च महिन्यात निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये आपल्या पक्षाचा पराभव झाल्याने, आपल्या ताब्यातील निवडणूक आयोगाला अर्दोगान यांनी पुन्हा निवडणुक घ्यायला लावली. अर्दोगान यांच्या पक्षाच्या विरोधात निकाल लागल्याने सत्ताधारी एके पक्षाने या निवडणुकांवर आक्षेप घेतला. त्यामुळे ही निवडणूक रद्द ठरवण्यात आली आणि पुन्हा निवडणुका झाल्या.
पण या तिकडमीचा काहीही उपयोग झाला नाही.  याही वेळी विरोधी पक्षाचे उमेदवार अक्रम इमामोग्लू विजयी ठरलेत. त्यांचे प्रतिस्पर्धी माजी पंतप्रधान बिनाली यिलड्रीम यांनी आपला पराभव मान्य केलाय. यिलड्रीम हे 2016 ते 2018 या कालावधीत तुर्कस्तानचे पंतप्रधान होते. यामुळे हा पराभव तुर्कस्तानातले गेल्या काही वर्षांतले सर्वांत शक्तीशाली नेते मानल्या जाणार्‍या एर्डोगन यांच्यासाठी धक्कादायक मानला जातोय. कारण ’इस्तंबूल जिंकणाराच टर्कीवर राज्य करतो,’ हे मत त्यांनीच यापूर्वी व्यक्त केलं होतं. शिवाय पहिल्या निवडणुकीनंतर त्याचे निकाल अमान्य करत पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी करण्याचा त्यांचा निर्णय चुकल्याचंही यातून सिद्ध झालं.
ही शहर आणि देशासाठीही नवी सुरुवात असल्याचं इमामोग्लू यांनी आपल्या भाषणात म्हटलंय. इस्तंबूलच्या इतिहासातलं एक नवं पान उलटलं जात असून यावर न्याय, समानता आणि प्रेमाची नोंद असेल. असं म्हटलं जातंय की या विजयासोबत आता विरोधी रिपब्लिकन पीपल्स पार्टीने राष्ट्राध्यक्षांसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. गेल्या 25 वर्षांमध्ये पहिल्यांदाच या पक्षाला इतका मोठा विजय मिळाला आहे. मार्च महिन्यात झालेल्या निवडणुकीमध्ये इमामोग्लू यांचा 13,000 मतांनी निसटता विजय झाला होता. पण यिलड्रीम यांनी हा पराभव मान्य करायला नकार दिला. या प्रक्रियेदरम्यान मतं पळवण्यात आली आणि अनेक मतपेट्यांवर लक्ष ठेवणार्‍या निरीक्षकांना अधिकृत परवानगीच देण्यात आलेली नव्हती असा आरोप सत्ताधारी पक्षाने केला. यानंतर निवडणुुुक आयोगाने पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतला.
सर्वात महत्वाचे म्हणजे अर्दोगान यांच्या पक्षाचा पराभव झाल्यानंतर लोकांनी जल्लोष केला. 25 वर्षांच्या सत्तेनंतर हा अर्दोगान यांचा पहिला पराभव होता. या पराभवाचा लोकांनी आनंद साजरा करणे याचा अर्थ स्पष्ट आहे. लोक आता अर्दोगान यांच्या सुलतानशाहीला कंटाळले आहेत. इस्तंबूल चा पराभव ही अर्दोगान यांच्या सत्तेला  सुरुंग लागायला सुरुवात झाली आहे. यातुन हिटलर आणि अर्दोगान यांना आदर्श मानणार्‍यांनी यातुन धडा घ्यायला हवा.  

No comments:

Post a Comment

भले तर देऊ कासेची लंगोटी

भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळांच्या माथी हाणू काठी तुकोबारायांचा या अभंगातील ओळ, 350 वर्षांनंतरही अजुनही राजकीय आणि सामाजिक स्थिती तशीच ...